Sunday, 1 March 2015

पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०) वार्षिक सभा- २८ फेब्रुवारी २०१५

|| हरी ओम ||

शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांची वार्षिक सभा "वडगांव मावळ" उपासना केंद्रामध्ये संपन्न झाली. केंद्रीय केन्द्र संपर्क समितीतील कार्यकर्ते "श्री अनिलसिंह पन्हाळे" व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पार पडलेल्या ह्या सभेमध्ये बहुचर्चित "श्रीश्वासम उत्सव", केंद्रांवरील अपेक्षित वातावरण, गुणसंकीर्तन ह्यांवर चर्चा झाली; तसेच भक्त व कार्यकर्त्यांच्या अनेक शंकांचे निरसनही झाले. वरुणराजाने अनपेक्षितरित्या लावलेल्या जोरदार हजेरीनंतरही सर्व केंद्रांतील कार्यकर्ते व भक्तांची उपस्थिती, येणाऱ्या भीषण काळाबाबत श्रद्धावानांना सावध करणाऱ्या परमपूज्य बापूंच्या निवडक परंतु अत्यंत वेचक व वेधक वाक्यांचा समावेश असलेली दृक्श्राव्य चित्रफीत, सभेच्या वेळी असलेले भक्तिमय वातावरण यांमुळे ही सभा अत्यंत सुंदर व संस्मरणीय ठरली. ह्या सभेची काही क्षणचित्रे:

मांडणी


उपस्थित श्रद्धावान कार्यकर्ते व भक्त


विविध केंदांचे प्रमुख सेवक आपल्या केंद्रांचा अहवाल थोडक्यात विशद करून सांगताना..


विविध केंदांचे प्रमुख सेवक आपल्या केंद्रांचा अहवाल थोडक्यात विशद करून सांगताना..
विविध केंदांचे प्रमुख सेवक आपल्या केंद्रांचा अहवाल थोडक्यात विशद करून सांगताना..


श्री अनिलसिंह पन्हाळे सर्वाना मार्गदर्शन करताना


श्री अनिलसिंह पन्हाळे सर्वाना मार्गदर्शन करताना


येणाऱ्या भीषण काळावर प्रकाश टाकणारे परमपूज्य बापूंचे बोल


आम्ही अम्बज्ञ आहोत

|| हरि ॐ ||

Friday, 15 August 2014

रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्रपठण- १५ ऑगस्ट २०१४

|| हरि ॐ ||

शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "स्वातंत्र्यदिनाचे" औचित्य साधून "पुरुषार्थ मंडलम कलश-०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा", "वडगांव मावळ", "तळेगांव दाभाडे" व "देहूरोड" या केंद्रांतर्फे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. "तळेगांव दाभाडे" येथील "कै. नथूभाऊ भेगडे प्रशाला क्र ०१" येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या उपक्रमात चारही केंद्रातील श्रद्धावान कार्यकर्ते, भक्त तसेच अनेक नवीन लोकांनीसुद्धा सहभाग घेतला. तळेगावातील "गरवारे रक्तपेढी" च्या सहाय्याने झालेल्या ह्या रक्तदान शिबिरात एकूण "४१" पिशव्या रक्त जमा झाले. यासोबतच चालू असलेल्या घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठणामध्ये दत्तगुरूंच्या मूर्तीवर अखंड तुळशीपत्रांचा अभिषेक सुरु होता. बापूंच्या आशीर्वादाने अत्यंत सुंदर व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या ह्या उपक्रमाची काही क्षणचित्रे:

नावनोंदणी

रक्तदानाची प्राथमिक नावनोंदणी करताना

हिमोग्लोबिन व इतर गोष्टींसाठी रक्ततपासणी करतानाकार्यकर्ते रक्तदान करतानारक्तदान झाल्यावर भक्तांना AADM व रक्तपेढीतर्फे प्रशस्तीपत्रके दिली गेली

मांडणी


पठणाच्या कक्षात दत्तगुरूंची मूर्ती

घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करताना श्रध्दावान

पठणाच्या वेळी दत्तगुरूंच्या मूर्तीवर तुळशीपत्रांचा अखंड अभिषेक

आरती


|| आम्ही अम्बज्ञ आहोत ||

Monday, 28 July 2014

वृक्षारोपण सेवा- २८ जुलै २०१४

|| हरि ॐ ||

सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली. या सेवेत चारही केंद्रातील एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या सेवेची काही क्षणचित्रे:कार्यकर्ते वृक्षारोपण करताना


लावलेली झाडे


सेवा संपन्न झाल्यावर


आम्ही अम्बज्ञ आहोत

|| हरि ॐ ||

Sunday, 27 July 2014

पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)- प्रथम वार्षिक सभा- २७ जुलै २०१४

|| हरि ॐ ||

रविवार दि. २७ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांची प्रथम वार्षिक सभा संपन्न झाली.गुणसंकीर्तन, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे यांसोबतच याठिकाणी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" च्या तसेच लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांच्या अधिकृत "ब्लॉग्स" चे उद्घाटन "गौरांगसिंह वागळे" यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांसमोर करण्यात आले. "केंद्रीय केन्द्र संपर्क समिती"चे कार्यकर्ते "श्री गौरांगसिंह वागळे", "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मैनेजमेंट" चे कार्यकर्ते "राजीवसिंह कदम" इ. कार्यकर्त्यांसोबत भक्तिपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेची काही क्षणचित्रे:

श्री गौरांगसिंसिंह वागळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानापुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०) च्या अधिकृत "ब्लॉग" चे गौरांगसिंह वागळे यांच्या हस्ते अनावरण करताना


ब्लॉग चे अनावरण झाल्यावर

प्रश्नोत्तरे

आम्ही अम्बज्ञ आहोत

|| हरि ॐ ||

Thursday, 10 July 2014

श्री प्रथम पुरुषार्थ धाम" (डूडूळ गाव)- श्रमदान सेवा

|| हरि ॐ ||

शुक्रवार दि. ०४ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव व देहूरोड" या केंद्रांमधील ६४ श्रध्दावान कार्यकर्ते व भक्तांनी "श्री प्रथम पुरुषार्थ धाम" (डूडूळ गाव) येथे श्रमदान सेवा केली. सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत झालेल्या या श्रमदानामध्ये पुढील सेवांचा सहभाग होता:

१) वाळू चाळणे
२) चाळलेली वाळू साठवण्यासाठी कच्चे दगडी हौद उभारणे
३) चुना ढवळणे
४) बेलफळांचा गर काढणे
५) झाडे लावण्यासाठी मशागत करणे

अत्यंत सुंदर व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सेवेची संधी आम्हाला मिळाल्याबाबत आम्ही अम्बज्ञ आहोत!


||हरि ॐ||

"श्री पुरुषार्थ मंडलम् कलश ०२-MH१२-०१७"- प्राथमिक बैठक

||हरी ओम्||

बुधवार दि. २५ जून २०१४ रोजी "श्री पुरुषार्थ मंडलम् कलश ०२-MH१२-०२०" अंतर्गत "लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड" या चार केंद्रांच्या निवडक कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली.
या बैठकीचे छायाचित्र:|| हरी ओम् ||