भक्ति-सेवा व सेवा-भक्ति उपक्रमांबाबत थोडक्यात

पुरुषार्थ मंडलम् कलश (०२-MH१२-०२०) मधील आजवरच्या भक्तिप्रधान सेवांमधील व इतर ठळक घडामोडी येथे नमूद करत आहोत.


  • शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "स्वातंत्र्यदिनाचे" औचित्य साधून "पुरुषार्थ मंडलम कलश-०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा", "वडगांव मावळ", "तळेगांव दाभाडे" व "देहूरोड" या केंद्रांतर्फे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. "तळेगांव दाभाडे" येथील "कै. नथूभाऊ भेगडे प्रशाला क्र ०१" येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या उपक्रमात चारही केंद्रातील श्रद्धावान कार्यकर्ते, भक्त तसेच अनेक नवीन लोकांनीसुद्धा सहभाग घेतला. तळेगावातील "गरवारे रक्तपेढी" च्या सहाय्याने झालेल्या ह्या रक्तदान शिबिरात एकूण "४१" पिशव्या रक्त जमा झाले. यासोबतच चालू असलेल्या घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठणामध्ये दत्तगुरूंच्या मूर्तीवर अखंड तुळशीपत्रांचा अभिषेक सुरु होता.
  • सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली. या सेवेत चारही केंद्रातील एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 
  • रविवार दि. २७ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांची प्रथम वार्षिक सभा संपन्न झाली.गुणसंकीर्तन, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे यांसोबतच याठिकाणी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" च्या तसेच लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांच्या अधिकृत "ब्लॉग्स" चे उद्घाटन "गौरांगसिंह वागळे" यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांसमोर करण्यात आले. "केंद्रीय केन्द्र संपर्क समिती"चे कार्यकर्ते "श्री गौरांगसिंह वागळे", "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मैनेजमेंट" चे कार्यकर्ते "राजीवसिंह कदम" इ. कार्यकर्त्यांसोबत भक्तिपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली.
  • शुक्रवार दि. ०४ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव व देहूरोड" या केंद्रांमधील ६४ श्रध्दावान कार्यकर्ते व भक्तांनी "श्री प्रथम पुरुषार्थ धाम" (डूडूळ गाव) येथे श्रमदान सेवा केली.
  • बुधवार दि. २५ जून २०१४ रोजी पुरुषार्थ मंडलम् कलश (०२-MH१२-०२०) मधील चारही केंद्रांच्या निवडक कार्यकर्त्यांची प्राथमिक सभा झाली, यामध्ये भविष्यकालीन कामकाजाची दिशा ठरवण्यात आली. (या बैठकीचे निवडक मुद्दे आपण "Meeting मधील महत्वाचे मुद्दे" या "Tab" मध्ये बघू शकता.)

No comments:

Post a Comment