Meetings मधील महत्वाचे मुद्दे



|| हरी ॐ ||

"पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" मधील कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, कार्यकर्त्यांना तसेच इतर केंद्रांना, कलशांना, केंद्रीय केंद्र संपर्क समितीला "पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" च्या बैठकांमधील मुद्दे कळावे यासाठी मुद्दाम येथे ही व्यवस्था केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------

दि. ०३ ऑगस्ट २०१४

  • शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" अंतर्गत "रक्तदान शिबीर" व "श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी विरचित घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण" आयोजित करण्यात आले आहे.
  • शिबिराची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०४.०० असेल.
  • शिबिराच्या ठिकाणी घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण चालू असेल. या ठिकाणी श्री दत्तगुरूंची मूर्ती असेल व त्यावर तुळशीपत्रांचा अक्षय अभिषेक चालू राहील. पठण सेवेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.
  • शिबिराच्या ठिकाणी "सद्गुरु माहिती कक्ष" असेल ज्यामध्ये नवीन भक्त/ लोकांना प.पू. बापू तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात येईल.
  • या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस संबंधित रक्तपेढीतर्फे पुढील एक वर्षासाठी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मोफत रक्त मिळेल; व रक्तदात्याच्या नातेवाईकांस सवलतीच्या दारात रक्त मिळू शकेल.
  • संबंधित रक्तदात्यास A.A.D.M. तर्फे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.


|| हरि ॐ ||



दि. २५ जून २०१४
  • "पुरुषार्थ मंडलम कलश- ०२-MH१२-०२०" च्या माध्यमातून दर महिन्याला किमान ३ भक्तांचे अनुभव "Record" करून CCCC ला पाठवणे.
  • प्रथम पुरुषार्थ धाम साठी जास्तीतजास्त सेवा देणे.
  • "पुरुषार्थ मंडलम् कलश" च्या प्रत्येक सेवेचे निरोप प्रत्येक कार्यकर्त्याला पुरेशा वेळेआधी मिळतील याची व्यवस्था करणे.
  • "पुरुषार्थ मंडलम् कलश" मधील सर्व कार्यकर्त्यांचा "Central Database" अर्थात "मध्यवर्ती माहितीकोश" तयार करणे, तो "पुरुषार्थ मंडलम् कलश" च्या ब्लॉग वर उपलब्ध करणे व त्याच्या "Hard Copies" प्रत्येक केंद्रावर देणे.
  • वृक्षारोपण सेवेचे नियोजन "वडगांव मावळ" व "लोणावळा" केंद्रांनी करावे व इतरांनी त्यात सहभागी व्हावे; तसेच रक्तदान शिबीराचे नियोजन "तळेगांव दाभाडे" व "देहूरोड" ह्या केंद्रांनी करणे व इतरांनी त्यात सहभागी व्हावे.
||हरी ॐ||

No comments:

Post a Comment