श्री पुरुषार्थ मंडलम कलश विषयी

|| हरी ॐ ||

"केंद्रीय केंद्र संपर्क समिती" कडून मिळालेल्या सूचनेनुसार प्रत्येक "पुरुषार्थ मंडलम् कलश" चा एक ब्लॉग अथवा वेबसाईट असावी. "पुरुषार्थ मंडलम् कलश" मधील सर्व केंद्रे एकत्र येऊन कोणते भक्ति-सेवा व सेवा-भक्ति चे उपक्रम राबवितात ह्याची सचित्र माहिती असणे आवश्यक आहे. ह्या सूचनेनुसार "पुरुषार्थ मंडलम् कलश-०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड" चा "ब्लॉग" बनविण्याचा प्रयास येथे केला आहे. ही सेवा आम्हाला मिळाल्याबाबत "आम्ही अम्बज्ञ आहोत.


"पुरुषार्थ मंडलम् कलश-०२-MH१२-०२०" ची पार्श्वभूमी

पुरुषार्थ मंडलम् कलश ची संकल्पना सर्वप्रथम अस्तित्वात आली तेव्हा वरील कलशात केवळ "लोणावळा" व "तळेगांव दाभाडे" ही दोनच केंद्रे "अधिकृत" होती. सदगुरुकृपेने २०१३ सालच्या अनिरुध्द पौर्णिमेला "वडगांव मावळ" व "देहूरोड" ही दोन केंद्रेही "अधिकृत" झाली. त्यामुळे ह्या कलशातील चारही केंद्रांनी मिळून सदगुरुंच्या भक्ति-सेवा व सेवा-भक्तीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे निश्चित केले. त्यासाठी दि. २५.०६.२०१४ रोजी चारही केंद्रांच्या निवडक कार्यकर्त्यांची प्राथमिक सभा "वडगांव मावळ" येथे घेण्यात आली.

"हे अनिरुद्धराया, तू प्रेमळ आहेस.. आणि आम्ही अम्बज्ञ आहोत !!!"

No comments:

Post a Comment